Wednesday, 14 May 2014

किटकॅट अँड्रॉइडचा ‘मोटो-ई’ @ ६,९९९

देशाच्या मोबाइल बाजारपेठेत 'मोटो जी'नं जोरदार धमाका केल्यानं नवी उभारी मिळालेली मोटोरोला कंपनी आता 'मोटो-ई' हा आपला नवा बजेट स्मार्टफोन ऑनलाइन बाजारात उतरवतेय. अँड्रॉइडचं ४.४ किटकॅट व्हर्जन, १ जीबी रॅमसारख्या एकापेक्षा एक फिचर्सनं सज्ज असलेल्या या ड्युएल सिम मोबाइलची किंमत फक्त ६,९९९ रुपये असून तो बुधवारपासून फ्लिपकार्टवरच मिळणार आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोटोरोलानं 'मोटो जी' हे आपलं ब्रह्मास्त्र घेऊन मोबाइल बाजारात दणदणीत 'कमबॅक' केलं. अद्ययावत आणि 'परवडेबल' 'मोटो जी'वर मोबाइलप्रेमींच्या उड्या पडल्या. हा उदंड प्रतिसाद पाहूनच, मोटोरोलानं आता 'स्वस्त आणि मस्त' मोबाइल वापरणाऱ्या मंडळींसाठी नवा स्मार्टफोन आणलाय. त्याचं नाव आहे, मोटो-ई आणि किंमत आहे ६,९९९ रुपये. 'मोटो ई'मध्ये हायटेक फिचर असल्यानं ग्राहकाचे पैसे नक्कीच वसूल होतील, असा कंपनीचा दावा आहे.

'मोटो ई'ची प्रमुख फिचर्स

स्क्रीनः ४.३ इंच, रिझोल्युशनः ७२०x१२१०
प्रोसेसरः १.२ गीगाहर्टझ ड्युएल-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २००
रॅमः १ जीबी
सिमः ड्युएल सिम, मायक्रो-सिम सपोर्ट
अँड्रॉइडः ४.४ किटकॅट
कॅमेराः ५ मेगापिक्सल रेअर कॅमेरा
स्टोरेजः इंटरनल स्टोरेज ४ जीबीपर्यंत, मायक्रो एसडी कार्ड ३२ जीबीपर्यंत
वजनः १४० ग्रॅम

No comments:

Post a Comment