Wednesday, 14 May 2014

सोनीचा आणखी एक वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच

जपानची दिग्गज कंपनी सोनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. एक्सपीरिया झेड-2 असं या नव्या फोनचं नाव आहे. हा फोनही वॉटरप्रूफ आहे. हा फोन सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस 5 आणि एचटीसी वन (M8) या फोन्सना टक्कर देईल, असं सांगण्यात येतंय.


एक्सपीरिया झेड-2  या फोनचीही किंमत अर्धा लाख, म्हणजेच 49,990 रुपये आहे. या फोनसोबत 5,990 रुपयांचा स्मार्ट बँड आणि 2,990 रुपये किमतीचा कव्हरही मिळेल.

एक्सपीरिया झेड-2 ची वैशिष्ट्ये

प्रोसेसर : 2.3 GHs क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन 801 (MSM8974AB)

ऑपरेटिंग सिस्टिम : 4.4 अँड्रॉईड

डिस्प्ले: 5.2 इंच फुल एचडी आयपीएस स्क्रीन, त्यामुळे सूर्यप्रकाशतही स्वच्छ दिसण्याची क्षमता

स्टोरेज क्षमता : 16GB मेमरी, 64 GB पर्यंत वाढवू शकता. या फोनला मायक्रो एसडी कार्डही सपोर्ट करू शकते.

बॅटरी : 3000MAH क्षमतेची दमदार बॅटरी

रॅम – 3GB

कॅमेरा – 20.7 मेगापिक्सल बॅक, आणि 2.2 मेगापिक्सल रेअर कॅमेरा

अन्य वैशिष्ट्ये- वॉटरप्रूफ, स्लो मोशन रेकॉर्डिंग, कॅमेरा अॅप्लिकेशनद्वारे अपलोडिंग 

No comments:

Post a Comment