Tuesday, 6 May 2014

लावाचा नवा टॅब्लेट ‘आयवोरी एस’

स्मार्टफोन मार्केटसोबतच टॅब्लेटच्या बाजारात पकड मजबुत करण्यासाठी लावा या मोबाईल कंपनीने आज आपला नवा टॅब्लेट लॉन्च केला आहे. लावा आयवोरिस हा नवा ३जी टॅब्लेट स्लिम, स्लिक तसेच ड्युअल सिम आहे. यात व्हाईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आलेली आहे.

व्‍हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये हा टब्लेट उपलब्ध करून देण्यात आला आहे. ड्युअल कोअर प्रोसेसर असलेल्या या टॅब्लेटची खास बात आहे याची किंमत ! या टॅब्लेटची किंमत फक्त ८४९९ रूपये इतकीच कंपनीने ठेवली आहे. या प्राईस रेंजमध्ये हा टॅब्लेट सर्वोत्तम पर्याय ठरतो.

आयवोरिसचा प्रोसेसर डुअल कोर MT८३१२ मीडिया टेक असून १,३ Ghzचा सीपीयू आहे. याची अड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम जेली बीन ४.२ असून १ जीबी रॅम आहे. या टॅब्लेटच्या डिस्प्ले साईज ७ इंच आहे. रेअर कॅमेरा ३.२ तर फ्रंट कॅमेरा व्हिजीए आहे.

लावा आयवोरिस मध्ये २८०० मिलीअम्पिअरची बॅटरी असल्यामुळे हा टॅब्लेट मजबुत बॅटरी बॅकअप देऊ शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे.

लावा आयवोरिसचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स पुढीलप्रमाणे...
ऑपरेटिंग सिस्‍टम- अंड्रॉइड जेली बीन ४.२
सिम – ड्युअल सिम दोन्ही जीएसएम
नेटवर्क- ३जी, २जी (EDGE/GPRS)
कॅमेरा- ३.२ रेअर तर फ्रंट कॅमेरा व्हिजीए
डिस्‍प्‍ले साइज- ७ इंच (१०२४ x ६०० px)
बॅटरी- २८०० mAh
प्रोसेसर- १.३ Ghz मीडिया टेक एमटी ८३१२ ड्युअल कोर
रॅम- १ जीबी
मेमरी - ४ जीबी इंटर्नल, ३२ जीबी एक्सपान्डेबल
वायफाय, ब्‍लूटूथ

No comments:

Post a Comment