Friday, 2 May 2014

एचटीसीची नवी झलक

एचटीसीने बाजारात नुकतेच नवीन मोबाइल बाजारात आणले आहेत. या फोनमध्ये एचटीसी डिझायर २१० या डय़ुएल सीम फोनचा समावेश आहे. यामध्ये आपल्याला मीडया टेकचा एमटी ६५७२ एम हा प्रोसेसर मिळतो. तर १ गीगाहार्ट्झचा डय़ुएल कोरचा सीपीयू मिळतो. यामध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामध्ये आपल्याला चार जीबी इंटर्नल मेमरी आहे. तर यातील मेमरी स्लॉटचा वापर करून आपण फोनची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
या फोनमध्ये ५१२ एमबीचा रॅम देण्यात आला आहे. यात देण्यात आलेल्या डय़ुएल सीममध्ये एक मायक्रो सिम आणि एक साधे सिम असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.
फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा सामान्य कॅमेरा देण्यात आला असून यात देण्यात आलेल्या फ्रंट कॅमेरा हा ०.३ मेगापिक्सेलचा व्हीएजी कॅमेरा आहे. यामध्ये आपण सर्वप्रकारचे ऑडिओ आणि व्हिडीओ पाहता येऊ शकतात. हा एचटीसीचा १० हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीचा मोबाइल असणार आहे. याची किंमत ८७०० रूपये असणार आहे. यात १३०० एमएएचची क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.

फोरजी सपोर्ट करणारा एम८
याशिवाय एचटीसीने फोरजी चालविता येईल असा एम ८ हा फोनही बाजारात आणला आहे. या फोनमध्ये आपल्याला २.५ गीगाहार्टझचा क्वाडकोर सीपीयू देण्यात आला आहे. याची इंटर्नल मेमरी १६ जीबीची देण्यात आली असून मायक्रो एसडीच्या साहय्याने आपण याची मेमरी १२८ जीबीने वाढवू शकतो. यामध्ये आपल्याला दोन जीबी रॅम देण्यात आली आहे. हा फोन २जी, ३जी आणि ४जी अशी कनेक्टीव्हिटी देण्यात आले आहे. यामध्ये आपल्याला नॅनो सिम वापरावे लागतात. या फोनचे आणखी एक वैशिष्ठय़ म्हणजे यामध्ये आपल्याला मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा देण्यात आला असून तो डय़ुएल कॅमेरा असणार आहे. म्हणजे मागच्या बाजूस एक मोठ आणि एक छोटा असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामुळे फोटो काढून झाल्यावर त्यातील एखादा भाग आपल्याला अधिक चांगला फोकस करून पाहवयाचा असेल तर तो चांगल्या दर्जाने पाहणे शक्य होणार आहे. यामध्ये आपल्याला फोटोचे विविध इफेक्ट्सही देण्यात आले आहेत. या फोनमध्ये २६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन हायएंड असल्यामुळे याची किंमत ४९९०० रूपये इतकी आहे.

No comments:

Post a Comment