सुट्यांमध्ये बाहेरगावी जायचे नियोजन झाले असेलच. सर्व तयारी सुरू असेल.
यामध्ये तुमच्या मोबाइलमध्ये कोणते अॅप्स असावेत याचीही एक यादी करून
घ्या आणि प्रवासात आपल्याला उपयुक्त ठरतील अशा काही अॅप्स विषयी आपण जाणून
घेऊयात..
माय सिटी वे- इंडिया
देशातील १५ महत्त्वाच्या शहरांची माहिती पुरविणारे हे अॅप आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते. या अॅपमध्ये आपल्याला प्रत्येक शहरातील खास आकर्षणांसह त्या ठिकाणची ५० विविध विभागांमधील माहिती आपल्याला या अॅपमधून उपलब्ध होते. हे अॅप खऱ्या अर्थाने आपल्याला त्या शहराबद्दल योग्य ती माहिती देत असते. तेथील पर्यटन स्थळे, हॉटेल्स, लोकल फूड्स आदी माहिती यामध्ये उपलब्ध असते. या अॅपमधील १५ शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, गोवा, हैद्राबाद, जयपुर, कानपूर, कोलकाता, लखनौ, लुधियाना, मुंबई, मसूर, पुणे आदी शहरांचा समावेश आहे. हे अॅप मोफत उपलब्ध आहे.
मॅप ऑफ इंडिया
नावाप्रमाणे हे अॅप आपल्याला भारताचा नकाशा दर्शविते. त्यानंतर आपल्याला जे राज्य हवे आहे ते निवडल्यावर तुम्हाला त्या राज्याचा नकाशा तर मिळतोच. त्याचबरोबर त्या राज्याशी संबंधित काही गंमतीशीर माहितीही तुम्हाला मिळते. याचमध्ये तुम्हाला स्थानिक विमानांची माहितीही मिळू शकते. यामध्ये तुम्ही दोन ठिकाणचे अंतर किती आहे, ते पार करण्यासाठी किती वेळ लागू शकतो आदी माहितीही मिळवू शकता. याशिवाय पीनकोड आणि एसटीडी कोडही या अॅपमध्ये तुम्हाला मिळू शकतो. हे अॅपही मोफत उपलब्ध आहे.
इंडिया ट्रॅव्हल गाइड
या अॅपमध्ये आपल्याला भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकातासह विविध १०० शहरांची माहिती मिळू शकते. यामध्ये आपण शहर निवडले की तिथे साइटसीन नावाचा पर्याय येतो. या पर्यायामध्ये या शहरात आपण कुठे कुठे भटकू शकतो याची सिविस्तर माहिती मिळते. पुढे जाऊन ही सर्व ठिकाणे फिरण्यासाठी कोणती वाहने उपलब्ध आहेत याची माहितीही यात मिळते. यातील इटिंग आऊट विभागामध्ये आपण तेथे कोणत्या प्रकारची खादाडी करू शकतो याची माहितीही मिळवू शकतो. जर तुम्हाला शहरातील रात्रीच्या जीवनाविषयी उत्सुकता असेल तर त्याची माहिती देणारी सोयही यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. या अॅपमध्ये आपल्याला भारताचा आणि काही महत्त्वाच्या शहरांचा ऑफलाइन नकाशाही देण्यात आला आहे. हे अॅप एकदा डाऊनलोड केले की ते ऑफलाइन काम करत राहते. यामुळे आपल्याला हे अॅप वापरण्यासाठी इंटरनेटची गरज भासत नाही.
ट्रिपइट ट्रॅव्हल ऑर्गनायझर
प्रवासाचा श्रीगणेशा करत असाल तर हे अॅप्लिकेशन नजरेखाली घालाच. प्रत्येकवेळी लांबच्या ठिकाणी पर्यटनाला जायचे म्हटले की, रेल्वे, बस, विमान, हॉटेल बुकिंग अशी तिकिटे आणि रिझव्र्हेशनच्या कागदांची आणि ईमेल्सची जंत्रीच आपल्यासमोर उभी राहते. यातील एखादी गोष्ट जरी गहाळ झाली अथवा वेळेवर सापडली नाही, तर गोंधळ सुरू होतो. मात्र, हे अॅप्लिकेशन तुमचा संपूर्ण दौरा ' ऑर्गनाइझ ' करते. तुमचे हॉटेल, एअरलाइन्स, कार, रेस्टॉरंटच्या आरक्षणाचे डिटेल्स स्र्'ंल्ल२@३१्रस्र््र३.ूे वर पाठवा आणि नििश्चत व्हा. तुमच्या दौरयातील प्रत्येक वेळेचे गणित हे अॅप्लिकेशन मेंटेंन ठेवते.
फ्री वायफाय फाइंडर
प्रवासादरम्यान किंवा बाहेरगावी गेल्यावर रोिमगदरम्यान डेटा नेटवर्कवरून इंटरनेट वापरणे म्हणजे खिशाला भगदाड पाडण्यासारखेच. त्यामुळे आपण बरयाचदा प्रवासात इंटरनेटचा वापर टाळतो. पण तुमच्या मोबाइलमध्ये वायफाय सुविधा असेल, तर वायफाय फाइंडर नावाचे हे अॅप तुम्हाला आसपासच्या कोणत्याही ठिकाणचे ओपन नेटवर्क शोधून देते. मग सायबर कॅफे असो की, एखादा मॉल असो, त्या ठिकाणचे वायफाय नेटवर्क ओपन असल्यास ते वापरणे सहज शक्य होते.
ओनादा करन्सी कन्व्हर्टर
बाहेरच्या देशांत गेले की, रुपयाच्या तुलनेत तिकडचे चलन किती? हा प्रश्न इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा अधिकवेळा पडत असतो. ओनादा करन्सी कन्व्हर्टर हा प्रॉब्लेम सहज सोडवतो. या अॅपच्या सा'ााने तुम्ही जगभरातील प्रमुख चलनांचे रुपयासोबतचे एक्स्चेंज रेट जाणून घेऊ शकता.
झोमॅटो
भारतातल्या कोणत्याही शहरातील कोणत्याही भागातील साध्या हॉटेलपासून पंचतारांकीत हॉटेल्सची माहिती असलेले हे अॅप्लिकेशन प्रवासातील दगदग कमी करते. या सर्व हॉटेल्सची माहिती, जाण्याचा मार्ग, तेथील सुविधा, दर यांसोबतच आधीच्या पर्यटकांनी हॉटेलबाबत नोंदवलेली निरीक्षणेही या अॅप्लिकेशनद्वारे उपलब्ध असतात. त्यामुळे हॉटेल चांगले की वाईट, हे तुम्ही तिथे जाण्याआधीच ठरवू शकता.
एनजीपे
बाहेरच्या ठिकाणी गेल्यावर तेथील वस्तू, आकर्षण असलेली स्थळे, पदार्थ यांची भुरळ पडते आणि मग खिशातला पसा आटू लागतो. मग आपली एटीएमसाठी शोधाशोध सुरू होते. पण एनजीपेसारखे अॅप असेल तर तुमचे आíथक व्यवहार काही क्लिकवर पार पाडता येतील. मग एखाद्या मॉलमध्ये ब्रँडेड कपड्यांची खरेदी करायची असो की, सिनेमाची तिकिटे बुक करायची असो एनजीपे तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध करून देते. यावरून केले जाणारे व्यवहार अत्यंत सुरक्षित असल्याने या अॅपचा गरवापर होण्याची भीती नाही. सध्या जवळपास १५ लाख युजर्स हे अॅप्लिकेशन वापरतात. जीपीआरएस असलेल्या कोणत्या फोनसाठी एनजीपे उपलब्ध आहे.

No comments:
Post a Comment