Wednesday, 14 May 2014

स्वस्त मस्त 'मोटो ई'ची सॅमसंग-सोनीला टक्कर

मोटोरोलाने कालच 'मोटो ई' हा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. अवघ्या 6, 999 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स आणि कार्बनला कडवी टक्कर तर देत आहेच पण सॅमसंग आणि सोनीपुढेही नवं आव्हान निर्माण केलं आहे.


कंपनीने फ्लिपकार्टवर हा फोन लॉन्च केला असून त्यासोबत विविध ऑफरही दिल्या आहे. 'मोटो ई'च्या कव्हरवर 50 टक्के ऑफ देण्यात आले आहे. तर ट्रान्ससेंडच्या 8 GB मेमरी कार्डवरही 50 टक्के सूट दिली आहे. इतकंच नाही 1000 रुपयांची निवडक ई-बुकही मिळणार आहेत. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

मायक्रोमॅक्स आणि कार्बन या कंपन्या स्वस्त फोनसाठी ओळखल्या जातात. पण आता मोटोरोलाने केवळ 6, 999 रुपयांत अपडेटेड व्हर्जनचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. महत्त्वाचं म्हणजे स्मार्टफोनच्या जगात जम बसवू पाहणाऱ्या नोकियासमोर ‘मोटो ई’मुळे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

बजेटमध्ये चांगल्या स्मार्टफोन्सना भारतीय बाजारात मागणी आहे. त्यामुळेच 'मोटो ई' हा पर्याय सर्व बाजूंनी योग्य ठरतो. फोनचा डिसप्ले 4.3 इंच असून यात गोरिला ग्लास 3 सह 960×540 पिक्सेल रिझॉल्युशन आहे. कमी किंमतीत इतकी हाय क्वॉलिटी डिसप्ले असलेला हा एकमेव स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्टार प्रोच्या तुलनेत मोटो ईचा डिसप्ले अतिशय चांगला आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्टार प्रोचा डिसप्ले 6,110 रुपये असून त्याचं रिझॉल्युशन 800×480 पिक्सेल आहे.

'मोटो ई'मध्ये अँड्रॉईड 4.4 किटकॅट ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम असून यात 1.2 गिगाहर्त्झ ड्युएल कोर प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 1 GB रॅम आहे. त्याचबरोबर 4 GB इंटरनल स्टोअरेज स्पेस आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. शिवाय यात 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, पण फ्रण्ट आणि एलईडी फ्लॅश मात्र यात देण्यात आलेला नाही. इतकंच नाही तर 'मोटो ई'मध्ये 3G सपोर्ट, ब्लूटुथ 4.0ही आहे.

तर 'सोनी एक्स्पेरिया ई' हा स्मार्टफोन ड्युएल सिम आणि सिंगल सिम व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सुमारे 7,990 रुपयांमध्ये ऑनलाईन मिऴणाऱ्या या फोनचा डिसप्ले 3.5 इंच आहे. यात 320×480 पिक्सेल रिझॉल्युशन, 512 MB रॅम आणि 3.15 व्हीजीए कॅमेरा आहे.

फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत सोनी आणि सॅमसंगच्या तुलनेत 'मोटो ई' हा उत्तम पर्याय आहे. पण हा फोन फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असल्याने कंपनीसाठी ती तोट्याची बाब आहे.

No comments:

Post a Comment