Saturday, 17 May 2014

सोनीचा एक्सपिरिया ए२; वॉटरप्रुफ फोन

जपानी मोबाईल उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपिरिया श्रेणीतील एक्सपिरिया ए२ (एसओ-०४एफ) हे आणखी एक नवे वॉटरप्रुफ मॉडेल लॉन्च केले आहे. एक्सपिरिया ए२ मध्ये एक्सपिरिया झेड१(एसओ-०२एफ) पेक्षा अधिक युटीलिटीज असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एक्सपिरिया ए२ हा वॉटरप्रुफ हॅन्डसेट स्लिम असून त्याची साइजही सहज कॅरी करता येण्यासारखी आहे. तसेच याचे स्क्रिन रिझोल्युशन १२८०x७२० असल्यामुळे स्क्रिनची क्लिअरिटी वाखाणण्याजोगी असल्याचे उत्पादक म्हणतात. यात एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तब्बल २०.७ मेगापिक्सेलचा पॉवरफुल कॅमेरा तसेच सोनीची G लेन्स आणि अपर्चर असल्यामुळे यातून फोटोग्राफी करतांना वेगळाच आनंद मिळणार आहे. किटकॅट ही अंड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टिम असून याचा फ्रंट कॅमेरा २.२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

एक्समोर सेंसर असलेला एक्सपपिरिया ए२ ची रॅम २ जीबी असून त्याला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. तब्बल १२८ जीबीचे मेमरी कार्ड हे हॅन्डसेट सपोर्ट करू शकणार आहे. पाच रंगात ए२ मिळणार आहे. सोनीने अद्याप ए२ ची किंमत मात्र जाहीर केलेली नाही.

एक्सपिरिया ए२ चे फिचर्स पुढीलप्रमाणे :
४.३ इंच ट्रिल्युमिनस स्क्रीन
रिझोल्यूशन १२८०x७२० पिक्सेल्स
स्‍नॅपड्रॅगन ८०० प्रोसेसर
४.४ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम
f/2.0 अपर्चर आणि G लेससहित रेअर कॅमेरा २०.७ मेगापिक्सेल्स
1080p व्हिडिओ रिकॉर्डिंग
फ्रंट कॅमेरा २.२ मेगापिक्सल
बॅटरी २३०० एमएएच
वॉटर आणि डस्टप्रूफ
वजन १३८ ग्रॅम
रॅम २ जीबी
इर्टनल मेमरी १६ जीबी आणि १२८ जीबीपर्य़ंत एक्सापडेंबल

No comments:

Post a Comment