Showing posts with label apps. Show all posts
Showing posts with label apps. Show all posts

Saturday, 17 May 2014

‘मोटोरोला’चं नवीन अॅप... तुमच्या सुरक्षेसाठी!

मोटोरोलाचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. केवळ एका दिवसात या फोननं चांगलीच लोकप्रियता मिळवलीय. त्याचं एक कारण म्हणजे ‘मोटो ई’मध्ये असणारं मोटोरोला ‘अलर्ट अॅप’.

Saturday, 10 May 2014

बना अॅपच्या दुनियेतील मॅक्सवेल

भारतीयांना क्रिकेटचा फीव्हर काही नवा नाही. आपल्याकडे क्रिकेटमध्ये सतत काही ना काही सुरू असतंच. त्यातच सध्या स्मार्टफोन्समध्ये क्रिकेट गेमचे बरेच अॅप उपलब्ध आहेत. यातील काही अॅपचा घेतलेला हा आढावा.

Friday, 9 May 2014

ऑनलाइन गेममध्ये तीन पत्ती, कँडी क्रश सागाची चलती

तिर्रट जुगार म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो कॅसीने मधला सीन. एका गोल टेबलच्या आजूबाजूला पाच ते सहा जण बसलेले. नोटांची समोर रास. चाल वर चाल सुरू. आणि अचानक शो मागून कोणी तरी एकजण एक्का, बादशाहा, राणी दाखवून डाव जिंकतो. हे दृष्य पाहण्यासाठी आता कॅसीनेमध्ये जायची गरज नाही. इंटरनेटच्या जगामध्ये मोबाईलमध्येच हा तिर्रट आता खेळण्याची सोय झाली आहे. तिनपत्ती या ऑनलाईन गेम प्रमाणेच कँडी क्रश सागा हा ऑनलाईन गेम देखील तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला आहे.

Thursday, 8 May 2014

मोबाइलची सुरक्षा

मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्ट फोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरसेस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. यामुळे यांच्यापासून जपून राहणे हे आपल्याला केव्हाही चांगले. विशेषत: एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो. यामुळे मोबाइलची काळजी घेणे हे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅण्टीव्हायरस तुम्ही टाकू शकता याची माहिती आपण जाणून घेऊ या.

Wednesday, 7 May 2014

कार्टून बनाविंग!

स्वतःचं कार्टून कसं दिसेल बघायचंय? मग आपल्या स्मार्टफोनवर फक्त एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि स्वतःची हवी तितकी कार्टून्स बनवा. सध्या हा ट्रेंड जोरात असून ही कार्टून्स एफबीवर किंवा व्हॉट्सअॅपवर टाकली जातायत.

Tuesday, 6 May 2014

सुटीचा 'अॅप' फॉर्म्युला

सुट्यांमध्ये बाहेरगावी जायचे नियोजन झाले असेलच. सर्व तयारी सुरू असेल. यामध्ये तुमच्या मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅप्स असावेत याचीही एक यादी करून घ्या आणि प्रवासात आपल्याला उपयुक्त ठरतील अशा काही अ‍ॅप्स विषयी आपण जाणून घेऊयात..

Monday, 5 May 2014

अपडेटेड फेसबुक मेसेंजर


इंटरनेटच्या दुनियेत फेसबुक माहिती नाही अशी व्यक्ती आता शोधूनही सापडणार नाही. अवघ्या नेटयूझर्सला वेड लावणाऱ्या फेसबुकची ख्याती सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच फेसबुकने आपल्या नावाने तत्काळ मेसेज पुरविणारे अॅप बाजारात आणलेले आहे.

Sunday, 4 May 2014

ल्युडो, सापशिडी मोबाइलवर!


सुटीचे वातावरण आहे, बच्चेकंपनी वेगवेगळे खेळ खेळतायत, काही ठिकाणी मैदानी खेळ रंगलेत तर काही ठिकाणी दुपारच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी घरांमध्ये, झाडांखालील सावलीत घरगुती खेळांचे डाव पडलेत...काही वर्षांपूर्वी हमखास दिसणारे हे चित्र आता स्मार्टफोनच्या जमान्यात बदललं आहे. कॅरम, सापशिडी, ल्युडो, बिझनेस, पत्ते असे बैठे खेळ पुन्हा बाहेर आलेत खरे पण, मुले ते खेळताना दिसतायत मोबाइल फोनवर!

Thursday, 1 May 2014

क्रिकेट ‘अॅप’

मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीचा फिवर आता कमी झाला आहे. मतदान होईपर्यंत आयपीएलच्या मॅचेसकडे सगळ्यांचं काहीसं दुर्लक्ष होत होतं. पण आता १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल लागणार असल्याने राजकारण जरा बाजूला पडेल. तोवर चर्चा रंगेल ती आयपीएलची. क्रिकेटफॅन्सना अपडेट ठेवण्यासाठी अनेक अॅप्स मार्केटमध्ये आले असून त्यांचं डाऊनलोडिंग वाढताना दिसेल.