'जी-मेल'ने युजरच्या गरजा
ओळखून नेहमीच आपला लूक अपडेट करण्याकडे लक्ष दिले आहे. आता पुन्हा गुगलने
'जी-मेल' नव्या स्वरूपात सादर केले असून नव्या लूकमध्ये इनबॉक्ससारख्या
पारंपरिक फीचर्सची रचना पूर्णपणे बदलण्यात आली आहे. गुगलने अद्याप नव्या
स्वरूपातील जी-मेल हे युजरच्या सेवेत कधी दाखल होईल, याबाबत कोणतीही घोषणा
केली नसली, तरी नव्या जी-मेलची स्क्रीन कशी असेल याची काही छायाचित्रे
उपलब्ध झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये जुन्या रचनेत बदल करण्यात आल्याचे
दिसत असून काही नवी फीचर्सही युजरसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.