भारतासारख्या देशात
शिक्षणाचे, इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी असले, तरी गेल्या काही
वर्षांत त्यात वाढ होताना दिसते आहे. इंटरनेटचा प्रसार सर्वदूर
खेड्यापाड्यात झाला नाही किंवा अनेकजण त्यापासून अनभिज्ञ आहेत, हे सत्य
असले, तरी महानगरांमध्ये ऑनलाइन वोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यास काही
हरकत नाही. असा प्रयोग या आधी गुजरातमध्ये करण्यात आला आहे. त्यास तितका
प्रतिसाद मिळाला नसला, तरी त्याकडे सकारात्मक पाहता येईल.