Saturday, 24 May 2014

पहिला भारतीय किटकॅट अन्ड्रॉइड फोन



मोटोरोलाने फक्त सात हजारामध्ये सामान्यांना परवडेल असा 'मोटो ई' लॉन्च केल्यानंतर मायक्रोमॅक्सनेही 'युनाइट टू' हा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची दोन वैशिष्ट्ये म्हणजे भारतीय कंपनीचा हा पहिला अॅन्ड्रॉइड ४.४.२ किटकॅट फोन आहे. तसेच या फोनमध्ये एकूण २१ भारतीय भाषा असल्याने याला ख-या अर्थाने भारतीय फोन म्हणता येईल.

Sunday, 18 May 2014

डाउनलोड ई-आधार

आधार कार्ड आता राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून कार्य करणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना प्रत्येक ठिकाणी याची मागणी होत आहे. आधार कार्ड आपण ऑनलाइन डाउनलोड करुन घेउ शकतो. फ़क्त त्यातले ट्प्पे माहित करुन घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा चुकीच्या स्टेप्स वापरल्यामुळे आधार कार्ड डाउनलोड होत नाही. यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करा-

Saturday, 17 May 2014

सोनीचा एक्सपिरिया ए२; वॉटरप्रुफ फोन

जपानी मोबाईल उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपिरिया श्रेणीतील एक्सपिरिया ए२ (एसओ-०४एफ) हे आणखी एक नवे वॉटरप्रुफ मॉडेल लॉन्च केले आहे. एक्सपिरिया ए२ मध्ये एक्सपिरिया झेड१(एसओ-०२एफ) पेक्षा अधिक युटीलिटीज असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

‘मोटोरोला’चं नवीन अॅप... तुमच्या सुरक्षेसाठी!

मोटोरोलाचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. केवळ एका दिवसात या फोननं चांगलीच लोकप्रियता मिळवलीय. त्याचं एक कारण म्हणजे ‘मोटो ई’मध्ये असणारं मोटोरोला ‘अलर्ट अॅप’.

Thursday, 15 May 2014

ऑनलाइन वोटिंग

भारतासारख्या देशात शिक्षणाचे, इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी असले, तरी गेल्या काही वर्षांत त्यात वाढ होताना दिसते आहे. इंटरनेटचा प्रसार सर्वदूर खेड्यापाड्यात झाला नाही किंवा अनेकजण त्यापासून अनभिज्ञ आहेत, हे सत्य असले, तरी महानगरांमध्ये ऑनलाइन वोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यास काही हरकत नाही. असा प्रयोग या आधी गुजरातमध्ये करण्यात आला आहे. त्यास तितका प्रतिसाद मिळाला नसला, तरी त्याकडे सकारात्मक पाहता येईल.

‘जी-मेल’चा चेहरामोहरा बदलणार

'जी-मेल'ने युजरच्या गरजा ओळखून नेहमीच आपला लूक अपडेट करण्याकडे लक्ष दिले आहे. आता पुन्हा गुगलने 'जी-मेल' नव्या स्वरूपात सादर केले असून नव्या लूकमध्ये इनबॉक्ससारख्या पारंपरिक फीचर्सची रचना पूर्णपणे बदलण्यात आली आहे. गुगलने अद्याप नव्या स्वरूपातील जी-मेल हे युजरच्या सेवेत कधी दाखल होईल, याबाबत कोणतीही घोषणा केली नसली, तरी नव्या जी-मेलची स्क्रीन कशी असेल याची काही छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये जुन्या रचनेत बदल करण्यात आल्याचे दिसत असून काही नवी फीचर्सही युजरसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Wednesday, 14 May 2014

सोनीचा आणखी एक वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच

जपानची दिग्गज कंपनी सोनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. एक्सपीरिया झेड-2 असं या नव्या फोनचं नाव आहे. हा फोनही वॉटरप्रूफ आहे. हा फोन सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस 5 आणि एचटीसी वन (M8) या फोन्सना टक्कर देईल, असं सांगण्यात येतंय.