Saturday, 24 May 2014

पहिला भारतीय किटकॅट अन्ड्रॉइड फोन



मोटोरोलाने फक्त सात हजारामध्ये सामान्यांना परवडेल असा 'मोटो ई' लॉन्च केल्यानंतर मायक्रोमॅक्सनेही 'युनाइट टू' हा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची दोन वैशिष्ट्ये म्हणजे भारतीय कंपनीचा हा पहिला अॅन्ड्रॉइड ४.४.२ किटकॅट फोन आहे. तसेच या फोनमध्ये एकूण २१ भारतीय भाषा असल्याने याला ख-या अर्थाने भारतीय फोन म्हणता येईल.

Sunday, 18 May 2014

डाउनलोड ई-आधार

आधार कार्ड आता राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून कार्य करणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना प्रत्येक ठिकाणी याची मागणी होत आहे. आधार कार्ड आपण ऑनलाइन डाउनलोड करुन घेउ शकतो. फ़क्त त्यातले ट्प्पे माहित करुन घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा चुकीच्या स्टेप्स वापरल्यामुळे आधार कार्ड डाउनलोड होत नाही. यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करा-

Saturday, 17 May 2014

सोनीचा एक्सपिरिया ए२; वॉटरप्रुफ फोन

जपानी मोबाईल उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपिरिया श्रेणीतील एक्सपिरिया ए२ (एसओ-०४एफ) हे आणखी एक नवे वॉटरप्रुफ मॉडेल लॉन्च केले आहे. एक्सपिरिया ए२ मध्ये एक्सपिरिया झेड१(एसओ-०२एफ) पेक्षा अधिक युटीलिटीज असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

‘मोटोरोला’चं नवीन अॅप... तुमच्या सुरक्षेसाठी!

मोटोरोलाचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. केवळ एका दिवसात या फोननं चांगलीच लोकप्रियता मिळवलीय. त्याचं एक कारण म्हणजे ‘मोटो ई’मध्ये असणारं मोटोरोला ‘अलर्ट अॅप’.

Thursday, 15 May 2014

ऑनलाइन वोटिंग

भारतासारख्या देशात शिक्षणाचे, इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी असले, तरी गेल्या काही वर्षांत त्यात वाढ होताना दिसते आहे. इंटरनेटचा प्रसार सर्वदूर खेड्यापाड्यात झाला नाही किंवा अनेकजण त्यापासून अनभिज्ञ आहेत, हे सत्य असले, तरी महानगरांमध्ये ऑनलाइन वोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यास काही हरकत नाही. असा प्रयोग या आधी गुजरातमध्ये करण्यात आला आहे. त्यास तितका प्रतिसाद मिळाला नसला, तरी त्याकडे सकारात्मक पाहता येईल.

‘जी-मेल’चा चेहरामोहरा बदलणार

'जी-मेल'ने युजरच्या गरजा ओळखून नेहमीच आपला लूक अपडेट करण्याकडे लक्ष दिले आहे. आता पुन्हा गुगलने 'जी-मेल' नव्या स्वरूपात सादर केले असून नव्या लूकमध्ये इनबॉक्ससारख्या पारंपरिक फीचर्सची रचना पूर्णपणे बदलण्यात आली आहे. गुगलने अद्याप नव्या स्वरूपातील जी-मेल हे युजरच्या सेवेत कधी दाखल होईल, याबाबत कोणतीही घोषणा केली नसली, तरी नव्या जी-मेलची स्क्रीन कशी असेल याची काही छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये जुन्या रचनेत बदल करण्यात आल्याचे दिसत असून काही नवी फीचर्सही युजरसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Wednesday, 14 May 2014

सोनीचा आणखी एक वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच

जपानची दिग्गज कंपनी सोनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. एक्सपीरिया झेड-2 असं या नव्या फोनचं नाव आहे. हा फोनही वॉटरप्रूफ आहे. हा फोन सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस 5 आणि एचटीसी वन (M8) या फोन्सना टक्कर देईल, असं सांगण्यात येतंय.

स्वस्त मस्त 'मोटो ई'ची सॅमसंग-सोनीला टक्कर

मोटोरोलाने कालच 'मोटो ई' हा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. अवघ्या 6, 999 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स आणि कार्बनला कडवी टक्कर तर देत आहेच पण सॅमसंग आणि सोनीपुढेही नवं आव्हान निर्माण केलं आहे.

मोबाइलचा स्क्रीन फुटण्याची यापुढे काळजी नको

एकाएकी मोबाइल खाली पडला की त्याचा स्क्रीन फुटतो. त्यानंतर काय सगळाच उजेड.. कॉलही करता येत नाहीत आणि कॉल घेताही येत नाही..अशावेळी मोबाइलचा स्क्रीन बदलण्याशिवाय काही तरणोपाय राहत नाही. टचस्क्रीनच्या जगात तर परिस्थिती आणखीनच बिकट होते. या पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी अशा प्रकारच्या प्लास्टिकची निर्मिती केली आहे, की तुटल्या-फुटल्यानंतर हे प्लास्टिक स्वतःच स्वतःची काळजी घेईल आणि तुटलेला भाग पुन्हा भरून काढेल. आश्चर्यचकित झालात ना! पण, हे अगदी खरे आहे.

किटकॅट अँड्रॉइडचा ‘मोटो-ई’ @ ६,९९९

देशाच्या मोबाइल बाजारपेठेत 'मोटो जी'नं जोरदार धमाका केल्यानं नवी उभारी मिळालेली मोटोरोला कंपनी आता 'मोटो-ई' हा आपला नवा बजेट स्मार्टफोन ऑनलाइन बाजारात उतरवतेय. अँड्रॉइडचं ४.४ किटकॅट व्हर्जन, १ जीबी रॅमसारख्या एकापेक्षा एक फिचर्सनं सज्ज असलेल्या या ड्युएल सिम मोबाइलची किंमत फक्त ६,९९९ रुपये असून तो बुधवारपासून फ्लिपकार्टवरच मिळणार आहे.

Sunday, 11 May 2014

फेसबुकला वर्ल्डफ्लोटचा दे धक्का !

सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.

Saturday, 10 May 2014

बना अॅपच्या दुनियेतील मॅक्सवेल

भारतीयांना क्रिकेटचा फीव्हर काही नवा नाही. आपल्याकडे क्रिकेटमध्ये सतत काही ना काही सुरू असतंच. त्यातच सध्या स्मार्टफोन्समध्ये क्रिकेट गेमचे बरेच अॅप उपलब्ध आहेत. यातील काही अॅपचा घेतलेला हा आढावा.

Friday, 9 May 2014

यापुढे मोबाइल फक्त मनोरंजनासाठी-रॉबिन जेफ्री

सध्या मोबाइल फोन हा आयुष्याचा भाग झाला असला तरी यापुढे मोबाइल फोन बोलण्यासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक वापरला जाणार असल्याचे भाकित रॉबिन जेफ्री या प्रसिद्ध कॅनेडिअन संशोधकाने वर्तवले आहे.

ऑनलाइन गेममध्ये तीन पत्ती, कँडी क्रश सागाची चलती

तिर्रट जुगार म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो कॅसीने मधला सीन. एका गोल टेबलच्या आजूबाजूला पाच ते सहा जण बसलेले. नोटांची समोर रास. चाल वर चाल सुरू. आणि अचानक शो मागून कोणी तरी एकजण एक्का, बादशाहा, राणी दाखवून डाव जिंकतो. हे दृष्य पाहण्यासाठी आता कॅसीनेमध्ये जायची गरज नाही. इंटरनेटच्या जगामध्ये मोबाईलमध्येच हा तिर्रट आता खेळण्याची सोय झाली आहे. तिनपत्ती या ऑनलाईन गेम प्रमाणेच कँडी क्रश सागा हा ऑनलाईन गेम देखील तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला आहे.

Thursday, 8 May 2014

मोबाइलची सुरक्षा

मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्ट फोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरसेस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. यामुळे यांच्यापासून जपून राहणे हे आपल्याला केव्हाही चांगले. विशेषत: एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो. यामुळे मोबाइलची काळजी घेणे हे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅण्टीव्हायरस तुम्ही टाकू शकता याची माहिती आपण जाणून घेऊ या.

Wednesday, 7 May 2014

कार्टून बनाविंग!

स्वतःचं कार्टून कसं दिसेल बघायचंय? मग आपल्या स्मार्टफोनवर फक्त एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि स्वतःची हवी तितकी कार्टून्स बनवा. सध्या हा ट्रेंड जोरात असून ही कार्टून्स एफबीवर किंवा व्हॉट्सअॅपवर टाकली जातायत.

एचटीसीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच

ताइवान मोबाईल कंपनी एचटीसीने आज आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन डिझायर ड्यूल सीम २१०  भारतात लाँच केला. यासह डिझायर ८१६ हा स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आला. एचटीसी वन (M8) लवकरच भारतात लाँच करण्याची घोषणाही यावेळी एचटीसीने केली.

Tuesday, 6 May 2014

लावाचा नवा टॅब्लेट ‘आयवोरी एस’

स्मार्टफोन मार्केटसोबतच टॅब्लेटच्या बाजारात पकड मजबुत करण्यासाठी लावा या मोबाईल कंपनीने आज आपला नवा टॅब्लेट लॉन्च केला आहे. लावा आयवोरिस हा नवा ३जी टॅब्लेट स्लिम, स्लिक तसेच ड्युअल सिम आहे. यात व्हाईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आलेली आहे.

सुटीचा 'अॅप' फॉर्म्युला

सुट्यांमध्ये बाहेरगावी जायचे नियोजन झाले असेलच. सर्व तयारी सुरू असेल. यामध्ये तुमच्या मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅप्स असावेत याचीही एक यादी करून घ्या आणि प्रवासात आपल्याला उपयुक्त ठरतील अशा काही अ‍ॅप्स विषयी आपण जाणून घेऊयात..

आता फेसबुकवर फोटो 'नापसंत' करण्याचीही सुविधा

फेसबुकवर एखादा फोटो आवडला नाही तर यापूर्वी केवळ कमेंट करण्याची सोय होती, परंतू आता तुम्हाला न आवडलेला फोटो नापसंतही (डिसलाईक) करता येणार आहे. सोशल मिडियामध्ये क्रांती घडवणा-या फेसबुकच्या या नव्या पर्यायामुळे फेसबुकजन आनंदीत झाले आहेत.
फेसबुकने 'लाईक' प्रमाणे 'डिसलाईक' हा पर्यायही द्यायला हवा, अशी मागणी ब-याच काळापासून होत होती. त्यानंतर फेसबुकने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा पर्याय आजच सुरू करून देण्यात आला असल्यामुळे सर्व फेसबुक वापरकर्त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्याची अंमलबजावणी होण्यास काळी काळ जाणार आहे.

Monday, 5 May 2014

सोनीचा Xperia Z2 लवकरच बाजारात

मोठ्या स्क्रीन साईजचा आणि दमदार हार्डवेअर असलेला सोनीचा आणखी एक स्मार्टफोन बाजारात येणार आहे. सोनीचा Xperia Z2 हा फोन भारतीय बाजारात 8 मे रोजी लॉन्च होणार आहे.

हा फोन 5.2 इंच स्क्रीन असलेला, तसेच 20.7 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला 4 जी फोन आहे. या फोनची किंमत 55 हजार रूपयांच्या जवळपास आहे.

अपडेटेड फेसबुक मेसेंजर


इंटरनेटच्या दुनियेत फेसबुक माहिती नाही अशी व्यक्ती आता शोधूनही सापडणार नाही. अवघ्या नेटयूझर्सला वेड लावणाऱ्या फेसबुकची ख्याती सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच फेसबुकने आपल्या नावाने तत्काळ मेसेज पुरविणारे अॅप बाजारात आणलेले आहे.

Sunday, 4 May 2014

ल्युडो, सापशिडी मोबाइलवर!


सुटीचे वातावरण आहे, बच्चेकंपनी वेगवेगळे खेळ खेळतायत, काही ठिकाणी मैदानी खेळ रंगलेत तर काही ठिकाणी दुपारच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी घरांमध्ये, झाडांखालील सावलीत घरगुती खेळांचे डाव पडलेत...काही वर्षांपूर्वी हमखास दिसणारे हे चित्र आता स्मार्टफोनच्या जमान्यात बदललं आहे. कॅरम, सापशिडी, ल्युडो, बिझनेस, पत्ते असे बैठे खेळ पुन्हा बाहेर आलेत खरे पण, मुले ते खेळताना दिसतायत मोबाइल फोनवर!

Friday, 2 May 2014

एचटीसीची नवी झलक

एचटीसीने बाजारात नुकतेच नवीन मोबाइल बाजारात आणले आहेत. या फोनमध्ये एचटीसी डिझायर २१० या डय़ुएल सीम फोनचा समावेश आहे. यामध्ये आपल्याला मीडया टेकचा एमटी ६५७२ एम हा प्रोसेसर मिळतो. तर १ गीगाहार्ट्झचा डय़ुएल कोरचा सीपीयू मिळतो. यामध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामध्ये आपल्याला चार जीबी इंटर्नल मेमरी आहे. तर यातील मेमरी स्लॉटचा वापर करून आपण फोनची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो.

Thursday, 1 May 2014

अॅपलचे रिसायलिंग कॅम्पेनिंग

जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळींना आपल्या आयफोन आणि आयपॅडची मोहिनी घालणाऱ्या अॅपलने आपल्या वापरल्या गेलेल्या सर्व प्रोडक्टचे अगदी मोफत रिसायलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या जगभरातील सर्व स्टोअर्स, ऑफिसेस आणि डाटा सेंटरमध्ये इनर्जी वाचविण्यासाठी ही पावले उचलली आहेत. यातून पृथ्वीवरील प्रदुषण कमी करण्यासाठी अॅपलने खारीचा वाटा उचचला आहे. 

आयबेरीचा ऑक्टा कोअर स्मार्टफोन

भारताच्या मोबाइल बाजारपेठेत धुमशान करण्यासाठी आयबेरी कंपनी सज्ज झाली आहे. एकापेक्षा एक भन्नाट, सुस्साट, जबरदस्त फिचर्स असलेल्या 'ऑक्सस न्यूक्लिया एक्स' मोबाइलचा झळाळता नजराणा ते मोबाइलवेड्यांसाठी घेऊन आलेत. येत्या ५ मेपासून ईबे वेबसाइटवरून त्याची विक्री सुरू होणार असून हा आजवरचा सगळ्यात स्वस्त ऑक्टा-कोअर स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. 

‘नोकिया एक्स’वर इंटरनेट मोफत

फिनलँडची आघाडीची मोबाइल हँडसेट निर्माती कंपनी नोकियाने मंगळवारी भारती एअरटेलशी करार केला आहे. त्यानुसार नोकिया एक्स स्मार्टफोन खरेदीदार एअरटेल असणार्‍या ग्राहकांना दर महिन्याला 500 एमबी थ्री-जी डाटा मोफत वापरास मिळणार आहे. ही ऑफर तीन महिन्यांसाठी आहे.

फ्लिपकार्टची मोबाईलसाठी बायबॅक ऑफर

फ्लिपकार्टच्या बायबॅक ऑफरमुळे आता मोटो जी विकत घेणे आणखी स्वस्त झालं आहे.  
फ्लिपकार्टने आता अनेक कंपन्यांच्या मॉडेल्ससाठी एक्सचेंज ऑफर सुरु केली आहे.

क्रिकेट ‘अॅप’

मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीचा फिवर आता कमी झाला आहे. मतदान होईपर्यंत आयपीएलच्या मॅचेसकडे सगळ्यांचं काहीसं दुर्लक्ष होत होतं. पण आता १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल लागणार असल्याने राजकारण जरा बाजूला पडेल. तोवर चर्चा रंगेल ती आयपीएलची. क्रिकेटफॅन्सना अपडेट ठेवण्यासाठी अनेक अॅप्स मार्केटमध्ये आले असून त्यांचं डाऊनलोडिंग वाढताना दिसेल.